Sunday, November 18, 2007

पुन्हा पुन्हा

काळजातल्या विणा  झंकारल्या पुन्हा पुन्हा
बदलुनिया वेश आले , दुख्ख माझे पुन्हा पुन्हा !!

प्रीतीच्या त्या आठवांनी जीव माझा मोहरतो
लाख छळले तू तरीही मी तुला सावरतो
वेदनांशी खेळताना काय मी केला गुन्हा ? !!1!
बदलुनिया वेश आले , दुख्ख माझे पुन्हा पुन्हा !!

मी असा शापित आहे , उजाडलेले गाव ज्याचे
खोडले तू नाव माझे तरी तुला मी जोडतो
पुसुनी टाक तू अंगी तुझिया चिकटलेल्या माझ्या खुणा !!2!!

देह लागला ढासलाया सुर्य कलाया लागला
नसता तू आता भोवती तरी स्वप्नातच मी रांगतो
सोसलेल्या त्या क्षणांचा मागू नको हिशोब जुना !!३
बदलुनिया वेश आले , दुख्ख माझे पुन्हा पुन्हा !!