Friday, March 15, 2013

आईचे मरण

आईचे मरण

चुकतो काळजाचा ठोका , पावूल वाजताना
देठात थर्थरे अंधार , झाडे सळसळताना

गूढ , अगम्य गर्तेत , मन फिरते सैरावैरा
तुटते जगण्याची उमेद , सावली फितुरताना

शिकविले हातांना मी , जोडण्या दोन्ही कर
पुसले स्वताच डोळे मलाच समजावताना

जप करितो मी कवितेचा , मानुनी शब्द ईश्वर
पचविले कैक दुख्ख , वेदना संचारताना

ऐकू कधी येतो , दबका आवाज मृत्यूचा
फुटतो बांध धीराचा , पणती सावरताना

सोसुनी झाले सारे , तरी अंगावर येई काटा
फोडता आईने टाहो , मरणाशी झुंजताना

नात्यांच्या सुटता गाठी , पोरका होतो देह
ओलावती पापण्या अजुनी , फुलपाखरू तडफडताना ...
BHAGWAN NILE

No comments: